आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Rawale May In Mns, May Contest Loksabha From Mns

दक्षिण मुंबईतून मनसेकडून मोहन रावले? शिवसेनेविरोधात दंड थोपटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेबांचे अंगरक्षक ते पाच वेळा लोकसभेद्वारे संसदेत पोहोचलेले व सध्या सेनेतून हकाटपट्टी करण्यात आलेले मोहन रावले लवकरच मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून, त्यांना मनसेकडून दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेकडून गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवलेले बाळा नांदगावकर यांना राज्यात रस असून, राज ठाकरेंनाही ते महाराष्ट्र विधिमंडळात हवे आहेत. त्यामुळेच मोहन रावलेसारखा खमक्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यास विजय खेचून आणू शकतात. त्यामुळे रावलेंना पक्षात प्रवेश देण्याबाबत मनसेत जोरदार विचारमंथन सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
रावले यांनी उद्धव यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्यावर शिवसेना स्टाईलने टीका करून खळबळ माजवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून सेनेकडून अरविंद सावंत यांना तिकीट देण्याचे घाटत आहे. उद्धव यांच्या टीमने त्यांना तयारीचे आदेश दिले आहेत. मनसेकडून गेल्या लोकसभा निवडणुकीत दुस-या क्रमांकाची मते घेणारे बाळा नांदगावकर लोकसभेसाठी यंदा इ्च्छूक नाहीत. तसेच त्यांच्या तोडीचा नेता मनसेकडे नाही. त्यामुळे मोहन रावलेंच्या रूपाने त्यांना खमक्या नेताही मिळेल व लोकसभेसाठी उमेदवारही मिळणार आहे. रावलेंचा लालबाग-परळ भागात चांगला दबदबा आहे तर, दादर परिसरात मनसेचा जोर आहे. त्यामुळे दक्षिण व मध्य मुंबईतून मनसे विजय मिळवू शकते, असे मनसेतील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच मोहन रावलेंना मनसेत लकरच प्रवेश मिळेल, असे सांगितले जात आहे.
सेना-रावलेंच्या वादळामुळे 'दुसरा मिलिंद' खूष, वाचा पुढे...