आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Rawale News In Marathi, Nationalist Congress, Shiv Sena

मोहन रावले राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माजी खासदार व नुकतेच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले ज्येष्ठ नेते मोहन रावले राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. बुधवारी त्यांनी नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असून, गुरुवारी मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.


मोहन रावले हे बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी तब्बल पाच वेळा दक्षिण मध्य मुंबईतून खासदारकी मिळवली होती. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची घेतलेली भेट व त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या टीकेमुळे रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर रावले मनसेत जातील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र आता ते राष्‍ट्रवादीच्या वाटेवर आहेत.