आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंच्या पीएवर विनयभंगाचा अाराेप, दाेन महिला सरकारी अधिकाऱ्यांना त्रास दिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अामदार पुत्र संतोष दानवे यांचे खासगी सचिव सचिन जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत दोन सरकारी महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याचा आरोप काँग्रेसचे नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केला. राजकीय दबावामुळे या महिला तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा दावा राणे यांनी केला. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारला चौकशीचे आदेश दिले.

राणे म्हणाले, संतोष दानवे यांचे पीए सचिन जाधव मद्यधुंद अवस्थेत रात्री देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. या वेळी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च पदावर असणाऱ्या एक महिला अधिकारी आणि मराठवाड्यातील आणखी एक महिला मुख्याधिकारी याच रेल्वेत होत्या. या वेळी जाधव याने या दोन महिलांचा विनयभंग केला. ‘इगतपुरी स्थानकाजवळ या दोन्ही महिलांनी या संपूर्ण प्रकाराची तक्रार महिला हेल्पलाइन’वर केली, मात्र या तक्रारीची नोंदच करण्यात आली नाही. स्वतःचे राजकीय लागेबांधे सांगत जाधव याने महिलांवर दबाव आणला. कुठेही तक्रार केली तरी मला फरक पडत नाही, अशी दमबाजी केली,’ असा आरोप राणे यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...