आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AC दुरुस्त करण्याच्या बहाण्याने गेला तिच्या घरात, त्यानंतर जवळ बोलवत केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात शिरून   अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. शमशाद शाह (24, रा. राबोडी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
 
पाणी देण्याच्या बहाण्याने बोलवले जवळ
त्याला कोर्टाने 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शमशाद हा पीडित मुलीच्या घरी एसी दुरुस्तीसाठी आला होता. त्यावेळी घरात कोणी नसल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर त्याने या अल्पवयीन मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने जवळ बोलविले आणि तिचा विनयभंग केला. तिच्या पालकांनी राबोडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. 
 
बातम्या आणखी आहेत...