मुंबई – आई केवळ दोन अक्षरी शब्द. पण, याच दोन अक्षरात ममतेचा आणि निस्वार्थतेचा सागर आहे. त्यामुळेच आपल्या पाल्याच्या भल्यासाठी आई काहीही करायाला तयार होते. मग ती मनुष्याची आई असो की, प्राणी पक्षांची. याचीच प्रचिती इंटरनेटर व्हायरल झालेल्या एका व्हीडीओमधून आली आहे. आपल्या पिल्लासाठी एक मादी ससा चक्क किंगकोब्रावर तुटून पडला आणि ससाचे रोद्ररुप पाहून क्रोबाने पळ काढला, हे या व्हीडिओमधून दिसत आहे.
नेमके काय आहे व्हीडिओत
एका ससाच्या बिळात असलेली दोन पिल्लं खाण्यासाठी एक किंग कोब्रा त्या ठिकाणी पोहोचला. त्याने बिळातून दोनही पिल्लं बाहेर काढली. मात्र, याची भणक लागताच पिल्लांची आई धावत त्या ठिकाणी आली. अगोदर तिने पिल्लांचा वास घेतला. मात्र, त्यांच्यात प्राणच राहिला नसल्याचे लक्षात येताच ती किंगकोब्रावर तुटून पडली. ससाचा रोद्रअवतार पाहून क्रोबाने तिथून पळ काढण्याचा मार्ग निवडला. पण, ससाने पाठलगा करत त्याला जेरीस आणले.