आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Laudering Case Not Probed Properly High Court

मनी लाँडरिंगप्रकरणी तटकरेंची झालेली चौकशी असमाधानकारक - उच्च न्‍यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याविरोधात दाखल मनी लाँडरिंग व जमीन बळकावल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीबाबत असमाधान व्यक्त करत उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.


न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तटकरेंविरोधात मनी लाँडरिंग आणि जमीन बळकावल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल दारिस खंबाटा यांनी लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे विभाग आणि रायगड जिल्हाधिका-यांनी सादर केलेला अहवाल न्यायालयात सादर करत तटकरे यांच्याविरोधात काहीही ठोस पुरावे आढळले नसल्याचे सांगितले. तटकरे यांनी त्यांचे नातेवाईक आणि अनेक मित्रांच्या नावे वेगवेगळ्या 51 कंपन्यांची स्थापना केल्याचे सोमय्या यांनी याचिकेत म्हटले आहे.


आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा आधार आपल्या अहवालात दिला आहे. तसेच तपास करणा-या तिन्ही यंत्रणांनी स्वत:ची अशी काहीही चौकशी केली नसल्याचे न्यायालयाने म्हटले. याप्रकरणी 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.