आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारी कर्ज जूनमध्ये फिटणार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळी शेतकर्‍यांच्या नोंदणीकृत सावकारांकडील १७१ कोटींच्या कर्जाचे वाटप ३० जूनअखेरपर्यंत केले जाईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, यंदा विदर्भ आणि मराठवाड्यातील २४ हजार गावांत दुष्काळी स्थिती आहे. येथील शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले हे कर्ज सरकारने माफ करण्याची घोषणा केली आहे. १५६ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज आणि त्यावरील १५ कोटी १९ लाख रुपये व्याज अशी एकंदरीत १७१ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. सुमारे २ लाख २३ हजार १५७ शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे.

ही घोषणा केवळ विदर्भ आणि मराठवाडा विभागासाठीच लागू आहे, असे पाटील म्हणाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र या निर्णयाचा फायदा केवळ सावकारांनाच होणार असल्याची टीका केली. माहितीच्या अधिकाराद्वारे प्राप्त माहितीमध्ये आणि सरकारने जाहीर केलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. १४ जानेवारीपर्यंतच्या माहितीमध्ये केवळ ६६ कोटींचे सावकारी कर्ज असल्याचे दिसून येते. मग राज्य सरकार १७१ कोटी रुपयांचे कुणाचे कर्ज माफ करणार आहे, असा सवालही त्यांनी केला.