आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपी व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमधून जेजेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॅाम्बे हॉस्पिटलमधील तब्बल ३५ दिवसांचा मुक्काम संपवून मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपी व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ पुन्हा जेजे रुग्णालयात बुधवारी दाखल झाले. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात गुरुवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यान जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना भुजबळांच्या बॅाम्बे हॉस्पिटलमधील वास्तव्याबाबत खुलासा करायचा असून त्याच्या एक दिवस अगोदरच भुजबळांना पुन्हा जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे.
विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत भुजबळांना बॅाम्बे रुग्णालयात वास्तव्य करण्याची अनुमती दिली असतानाही अचानक त्यांना बॅाम्बे हॉस्पिटलमधून हलवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या एका आदेशानुसार भुजबळांच्या तीन वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार होत्या. त्यापैकी दोन चाचण्यांसाठी आवश्यक असलेली व्यवस्था जेजे रुग्णालयात उपलब्ध होती, तर उर्वरित एक वैद्यकीय चाचणी खासगी रुग्णालयात करण्याची मुभा न्यायालयाने दिली होती.
त्यानुसार २७ आॅक्टोबरला भुजबळांना आर्थर रोड कारागृहातून जेजे रुग्णालयात हालवण्यात आले. त्यानंतर २ नोव्हेंबरला छगन भुजबळ यांना परस्पररीत्या बॅाम्बे हॅास्पिटलला दाखल करण्यात आले होते. तसेच भुजबळांनी नाजुक प्रकृती लक्षात घेता त्यांना बॅाम्बे हॅास्पिटलला अधिक काळ राहण्याची मुभा घ्यावी अशी विनंती विशेष पीएमएलए न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान करण्यात आली. या सर्व प्रकाराबाबत ईडीच्या वतीने विशेष न्यायालयात प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यावर विशेष न्यायालयाने डॅा. लहानेना खुलासा करण्यास सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...