आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monica Bedi Moves HC Over Reissuance Of Passport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पासपोर्टसाठी मोनिका बेदीची हायकोर्टात धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पासपोर्ट कार्यालयाला आपल्या पारपत्राबाबत निर्देश देण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री व गँगस्टर आबू सालेमची पूर्वीची पे्रयसी मोनिका बेदी हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे व के. एस श्रीराम यांनी पासपोर्ट कार्यालय आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केवळ पासपोर्ट नसल्याने चित्रीकरणासाठी परदेशात जाता येत नाही. त्यामुळे करिअरला बाधा पोहोचत असल्याचे मोनिकाने म्हटले आहे. 2005 मध्ये सालेम व मोनिकाला पोर्तुगाल येथून अटक केली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतरही तिला पासपार्ट मिळालेला नाही.

पासपोर्टसाठी बनावट कागदपत्रे दिल्याने तिला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, 2007 मध्ये तिची जामीनावर या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली. यांनतर तिने सप्टेंबर 2012 मध्ये पासपोर्ट परत देण्यासाठी विभागीय कार्यालयाकडे अर्ज केला. तसेच तिने अर्जासोबत शपथपत्र देखील दिले. मात्र, याबाबत अजूनही काहीही निर्णय घेण्यात आला नसल्याचे तिचे वकील नितीन प्रधान यांनी सांगितले.