आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनिका मोरे अपघातप्रकरणी रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून दोन्ही हात गमवावे लागलेल्या मोनिका मोरे हिच्या वडिलांनी रेल्वे प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी आज सकाळी मुंबई हायकोर्टाने माध्यमांतील बातम्यांची दखल घेऊन मोनिकाच्या अपघातप्रकरणी उत्तर द्यावे अशी नोटिस बजावली आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी काल सायंकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. एकूनच या प्रकरणाने आता वेगळेच रूप धारण केले आहे.
आज दुपारी मोनिकाच्या वडिलांनी रेल्वे प्रशासनाविरूद्ध निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल केला. त्याआधी मुंबई हायकोर्टाने माध्यमातील बातम्यांची दखल घेऊन रेल्वेमंत्री, मुंबई रेल्वे प्रशासन, मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाच्या डीआरएम यांना न्यायालयाने नोटिस बजावली आहे. तसेच मोनिकाच्या अपघाताला कोण आणि कसे जबाबदार आहे याचे उत्तर देण्यास सांगितले आहे.
मोनिका मोरे हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये- दरम्यान, लोकल पकडताना झालेल्या दुर्देवी अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या विद्यार्थीनीस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी तिच्या उपचारासाठी खर्च करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात एसएनडीटी कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या मोनिका मोरे हिला आपले दोन्ही हात गमवावे लागले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन ही मदत जाहीर केली आहे.