आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील पहिली मोनो रेल अखेर मुंबईत धावली,पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील पहिली आणि बहुचर्चित मोनो रेल अखेर मुंबईत धावली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी या रंगीबेरंगी गाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एमएमआरडीएचे अधिकारी यांनी मोनो रेलेच्या पहिल्या प्रवासाचा आनंद लुटला. मुंबईकरांनी कुतूहलाचा विषय ठरलेल्या उद्घाटन सोहळ्याला मोठी गर्दी केली होती. चाकरमान्यांना मात्र मोनोची सफर करण्यासाठी रविवारी सकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मोनो रेल येत्या फेब्रुवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू होते असल्याचे कळल्यापासून मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. ट्रेन, बसेस, रिक्षा व टॅक्सी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रचंड गर्दीला वैतागलेल्या मुंबईकरांना मोनो रेलमुळे दिलासा मिळणार असल्याने या गुलाबी फ्लायओव्हरवरून धावणा-या रेल्वेत बसण्यासाठी मुंबईकर उत्सुक असल्याचे दिसले. त्याचे प्रत्यंतर आजच्या उदघाटन सोहळ्यातही दिसून आले.
वडाळा डेपोतून मोनो रेलला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तुतारीच्या नादात अगदी मराठमोळ्या पद्धतीने मोनोची सफर सुरू झाली. वीस मिनिटांची सफर पूर्ण करत अखेर मोनो चेंबूर स्थानकात पोहोचली. तिथेही मोनोचे स्वागत करण्यात आले. मुंबईतील मोनो हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याने त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आमंत्रित करण्याची राज्य सरकारची इच्छा होती; परंतु त्यांची तारीख न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी मोनोला हिरवा झेंडा दाखवला. सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंतचीच शिफ्ट सध्या मोनो करणार आहे. त्यामुळे ऑफिसला जाताना मोनोमधून प्रवास करता येईल; पण ऑफिसमधून परत येताना मोनोऐवजी लोकलनेच प्रवास करावा लागणार आहे. सकाळी मोनो ट्रेन ९ मिनिटाला एक अशी असणार आहे. म्हणजे तासाभरात सहा ते सात मोनो धावणार आहेत.
दीडशे जणांचा प्रवास
मोनो रेलच्या एका डब्यामध्ये 20 प्रवाशांना बसण्याची, तर 130 प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा आहे. म्हणजेच एका डब्यामधून दीडशे प्रवासी प्रवास करू शकतात. अशा चार डब्ब्यांमध्ये एका वेळी सहाशे प्रवासी प्रवास करू शकतील. ९ मिनिट फ्रिक्वेन्सीनुसार जर एका तासाला सहा ते सात ट्रेन्स धावल्या, तर दर तासाला
मोनो रेलसाठी 1200 कोटी खर्च
जगातील सर्वात लांब मोनो रेल ही जपानमधील ओसाका मोनो रेल आहे. ओसाका मोनो रेल ही 23.8 कि.मी. मार्गावर धावते. ओसाका मोनो रेलच्या उभारणीसाठी तब्बल 12 हजार 690 कोटी खर्च करण्यात आला आहे, तर मुंबईच्या मोनो रेलसाठी 1200 कोटी खर्च करण्यात आला आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी मोनो रेलचे एकूण 250 कर्मचारी तैनात असणार आहेत.