आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत चेंबूरमध्ये एकमेकांसमोर आल्या दोन मोनो रेल, MMRDA ने सांगितले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चेंबूर भागात शनिवारी रात्री दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर आल्याची घटना घडली. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. चेंबूर भागात झालेल्या या घटनेनंतर लोकांनी फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. त्यासोबतच प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ सुरु असल्याचे सांगत मोनोरेल व्यवस्थापनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
 
समोर आले हे सत्य... 
- दोन्ही मोनो रेल एकाच ट्रॅकवर एकामेकांसमोर आल्या हे खरे असले तरी त्यामागचे सत्य वेगळेच होते. 
- मोनोरेल संचालित करणाऱ्या मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) ने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, एका मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्यात प्रवाशी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी दुसरी मोनोरेल बोलवण्यात आली होती. 
- त्या ट्रेनमधील प्रवाशांना मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये बसवून सुखरुप स्टेशनपर्यंत पोहोचवण्यात आले. 
- मात्र या घटनेनंतर मोनोरेलची समोरासमोर टक्कर झाल्याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले. 
बातम्या आणखी आहेत...