आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुवांधार: लोकल घसरली, मोनो रेल बिघडली; अडीच तास अडकले होते प्रवाशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रविवारी पहाटेपासून मुंबई परिसरात पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने शहर व उपनगरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात आठवड्याचा पहिला दिवस अर्थात सोमवारी चाकरमान्यांची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. वडाळयामध्ये भक्तीपार्कजवळ तांत्रिक ब‍िघाडामुळे मोनोरेल बंद पडली. त्यात तब्बल अडीच तास प्रवाशी अडकले होते. त्यांना क्रेनद्वारे बाहेर काढण्यात आले.

दुसरीकडे, कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1ए वरून सीएसटीच्या दिशेने निघालेली लोकल रुळावरून घसरली. यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. . ही लोकल कल्याणहून सीएसटीकडे न‍िघाली होती. लोकलचा डबा रुळावरून घसरला. सुदैवाने लोकलचा स्पीड कमी असल्याने कोणतीही जीवितहानी वा कोणीही जखमी झालेले नाही.
- खर्डी स्थानकाजवळ सिग्नल बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झालेली असतानाच आता कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचा पुन्हा बोजवारा उडाला आहे.

सोमवारी सकाळी खर्डीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कसार्‍याहून आसनगावपर्यंत वाहतूक ठप्प झाली. सिग्नल दुरुस्तीचे काम होत नाही, तोच कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1ए वरून सीएसटीच्या दिशेने निघालेली लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरला. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून रुळ दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यात नागोठाणेजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने दिवा- सावंतवाडी पॅसेंजरचा खोळंबा झाला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... देशाची पहिली मोनो रेल बिघडली...पॉवर फेल झाल्याने थांबली मोनो रेल... चाकरमान्यांना बनला फटका...चोवीस तासांत पुन्हा मुसळधार
बातम्या आणखी आहेत...