आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस आधीच मान्सून केरळात, तीन जूनला महाराष्ट्रात येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैऋत्य मोसमी पाऊस निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच केरळात. - Divya Marathi
नैऋत्य मोसमी पाऊस निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच केरळात.
नवी दिल्ली, औरंगाबाद - नैऋत्य मोसमी पाऊस निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच केरळात दाखल झाल्याचे मंगळवारी आयएमडीने जाहीर केले. अंदमान व निकोबार बेटांवर १४ मे रोजी दाखल झाल्यानंतर काहीसा रेंगाळलेल्या मान्सूनला बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळाने भारतीय उपखंडाकडे खेचण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
 
दरवर्षी एक जून रोजी मान्सून केरळात दाखल होत असतो, यंदा तो ३० मे रोजीच केरळ किनारपट्टीवर दाखल झाल्याचे आयएमडीचे महासंचालक के.जे. रमेश यांनी सांगितले. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून ३ जूनपर्यंत माेसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यंदा बंगालच्या उपसागरातील मोरा वादळाने मान्सूनला गती मिळाली.  त्यामुळे अंदमान बेटे ते केरळ असा मान्सूनचा प्रवास गतीने झाला. केरळसह नागालँड, मणिपूर, मिझोराम व अरुणाचलातही मान्सून दाखल झाला.
 
मोरा वादळाचे महत्त्व  
मोरा वादळ हे नाव थायलंडने दिले अाहे. थायी भाषेत मोरा म्हणजे समुद्रातील तारा. बंगालच्या उपसागरात २९ मे रोजी मोरा वादळ निर्माण झाले. ते ३० मे रोजी  बांगलादेशात धडकले. मोरामुळे बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा भारतीय उपखंडाकडे वेगाने खेचली गेली. त्यामुळे निर्धारित वेळेच्या ४८ तास आधीच मान्सून भारतीय उपखंडात आला. दरम्यान, १५ वर्षांनंतर मान्सून केरळ व ईशान्य अशा दोन्ही बाजूंनी देशात आला आहे. 
 
महाराष्ट्र : ३ जूनपर्यंत पुणे वेधशाळेचा अंदाज 
३१ मे व १ जून

कोकण-गोव्यात बहुतेक ठिकाणी,मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात  तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 
२ व ३ जून
संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
 
महाराष्ट्रात आठवडाभर आधीच आगमन  
केरळात दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अरबी  समुद्रात सध्या अत्यंत अनुकूल वातावरण अाहे. त्यामुळे सध्याची स्थिती लक्षात घेता ३ ते ४ जून रोजी मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येईल. 
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ व सदस्य, संशोधन समिती, व.ना.मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, कशी सुरु आहे मान्‍सूनची आगेकूच...
 
हे पण वाचा,
 
बातम्या आणखी आहेत...