आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोकणसह कोल्हापूर, सातार्‍यात बरसल्या पहिल्या पावसाच्या सरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सर्वसामान्य ज्याची मनापासून वाट पाहात होते तो मान्सून अखेर मंगळवारी केरळसह महाराष्‍ट्रात दाखल झाला. कोकणातील रत्नागिरीसह कोल्हापूर, सातारासह परिसरातही पावसाचे आगमन झाले. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. दुपारपासून सुरु झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, कागल, गारगोटी, मुरगूड भागातही पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी चार वाजेनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. पावसाअभावी रेंगाळलेल्या विविध शेतीकामांना वेग आल्याचेही चित्र दिसत आहे.
रत्नागिरीसह अनेक भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी 2.7 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद रत्नागिरीच्या नियंत्रण कक्षात करण्‍यात आली.
दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था काहीसी गर्तेत असल्याने मान्सूनवर सरकारच्या आशा आहे. मात्र दरवर्षीपेक्षा तो तीन-चार दिवस उशीरानी केरळमध्ये दाखल झाला. मंगळवारी केरळात मान्सूनच्या पहिल्या सरी बरसल्या. फिलीपाईन्स जवळच्या पश्चिमी प्रशांत महासागरात टायफून नावाचे चक्रीवादळ आले असून, त्याच्या दाबामुळे लवकरत मान्सून भारतात सक्रिय होईल, असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डी. शिवानंद पाई यांनी सांगितले की, मान्सूनचा वेग चांगला असून, केरळसह कर्नाटकात येत्या एक -दोन दिवसांत चांगला पाऊस पडेल.
हवामान विभागाने म्हटले आहे की, येत्या पाच दिवसांत मान्सून मुंबईत पोहचेल. तसेच १५ जूनच्या आसपास मान्सून गुजरात, राजस्थान पार करुन उत्तर भारतात दाखल होईल. मान्सून १ जूनच्या कालावधीत केरळमध्ये दाखल व्हायला हवा होता. मात्र तो पाच जूनला दाखल झाला आहे. भारतात मान्सून दाखल झाल्याने सरकारने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
मान्सून एक जूनला केरळ किनारपट्टीवर धडकणार
आठ दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून
मराठवाड्यासह खान्देश, विदर्भाला झोडपले; वीज पडून 22 ठार