आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Session For Maharashtra State Assembly From Today

मंत्रालयाच्या आगीचे धगीमुळे विधिमंडळाच्या कामकाजाचा विचका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयाला आग‍ीच्या मुद्दावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्याने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडला आहे. मंत्रालयाला आग लागली की लावली? या प्रश्नावर विरोधक अडून बसले होते. त्यामुळे आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी मंत्रालयाची आग, बेळगाव सीमाप्रश्न आणि सिंचनाच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना आणि मनसेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकारचा निषेध व्यक्त करत विरोधकांनी सभागृहात प्रवेश केला. परंतु मंत्रालयाच्या आगी बाबत चर्चेची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधक आणखीच आक्रमक झाले. त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केला. परिणामी विधानसेभेचे कामकाज सुरुवातीला दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्‍यात आले होते. त्यानंतर कामकाज सुरु होताच विरोधकांनी मंत्रालयाचा आगीचा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर पुन्हा 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र परिस्थितीत बदल न झाल्याने विधानसभेसह विधानपरिषदेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
मंत्रालयाच्या आगी मागे सत्ताधारी कॉंग्रेस सरकारचाच हात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी‍ विरोधक आक्रमक झाले आहे. मंत्रालयाची आग, बेळगाव सीमाप्रश्न आणि सिंचनाच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना आणि मनसेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.
अधिवेशनात सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे विरोधकांनी रविवारी स्पष्ट केले. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरून अडचणीत आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रविवारी एकनाथ खडसे यांच्या शासकीय निवासस्थानात झालेल्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षांतील सर्व गटनेत्यांनी हजेरी लावली होती.
मंत्रालयात लागलेल्या आगीमुळे राज्य सरकारची प्रतिमा धुळीस मिळाली असून या आगीत पाच जणांचा मृत्यू होऊनही अद्याप गुन्हा नोंद न झाल्याबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. ही आग लागली होती की घातपात होता, याविषयी शंका व्यक्त करून सरकारच्या अकार्यक्षमतेचा नमुना यामुळे पाहायला मिळाल्याचे खडसे यांनी सांगितले.
आग, पाणी, भ्रूणहत्या विधिमंडळात गाजणार; विरोधक सरकारची करणार कोंडी
बेळगाव महापालिका पुन्हा बरखास्त; मराठीद्वेष उफाळला
सिंचन योजनांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री