आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Session Of Maharashtra Assembly To Begin From Monday

मुख्‍यमंत्र्यांनी राज्‍य गहाण ठेवलेः एकनाथ खडसेंचा आरोप, सरकारच्‍या चहापानावर बहिष्‍कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्‍यमंत्र्यांच्‍या चहापानावर बहिष्‍कार टाकताना विरोधकांनी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांना लक्ष्‍य केले. मुख्‍यमंत्र्यांनी राज्‍य गहाण टाकल्‍याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइंसह महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेनेही चहापानावर बहिष्‍कार टाकला.

सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनाच्‍या पूर्वसंध्‍येला विरोधी पक्षांची बैठक झाली. त्‍यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचे म्‍हणजे, मनसेचाही बैठकीत सहभाग होता. बैठकीनंतर झालेल्‍या पत्रकार परिषदेत खडसे यांनी आघाडी सरकारवर टीका केली. ते म्‍हणाले, सरकारचा भोंगळ कारभार सुरु आहे. फाईली गहाळ होतात. सरकारमधील मंत्रीच एकमेकांवर आरोप करतात. फाईली कोणी गहाळ केल्‍या, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.