आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Session, Oppositions Targets Fadanvis & Panakaja Munde

शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही- विरोधकांनी सरकारला घेरले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील फडणवीस सरकारला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घेरले. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी दिलीच पाहिजे व या प्रश्नावर विधीमंडळात आजच्या आजच चर्चा झाली पाहिजे अन्यथा अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधकांनी सरकारला दिला. चिक्की कंत्राटाच्या कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधातही विरोधकांनी घोषणा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करता येणार नाही. शेतक-यांना सक्षम करण्यासाठी हा उपाय उपयोगाचा व दीर्घकालीन नाही असे सांगत विरोधकांचा मुद्दा फेटाळून लावला होता. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता अधिवेशनासाठी मुख्यमंत्री फडणवीस विधानभवनात दाखल होताच त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासोबतच इतर प्रश्नही सरकारने तत्काळ सोडवावेत तसेच विविध आरोप झालेल्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी केली. विधानभवनाच्या पाय-यावरच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
फडणवीस सरकारमधील पाच-सहा मंत्र्यांवर होत असलेल्या वेगवेगळे आरोपांवरूनही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचे डावपेच रचले आहेत. याचबरोबर फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून सुमारे दीड हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून विरोधक रणकंदन करण्याची शक्यता आहे. शेतक-यांच्या आत्महत्या आम्ही रोखू शकलो नाही अशी कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणाबाबत सरकार काहीही हालचाली करीत नसल्याने सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. मंत्री बबनराव लोणीकर, विनोद तावडे, पंकजा मुंडे, रणजित पाटील आदी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली. शेतक-यांना कर्जमाफी द्या अन्यथा खूर्च्या रिकाम्या करा असे सांगत आरोप झाल्यावर मंत्र्यांविरोधात विरोधकांनी उपरोधिक घोषणा दिल्या. राज्य सरकारची धोरणे शेतकरी विरोधी, सर्वसामान्याच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.
पुढे आणखी वाचा, अधिवेशनासंदर्भातील माहिती...