आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानभवनात विरोधकांचे \'भजन\' आंदोलन, सरकारकडून मीडिया कव्हरेजला बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाळ-भजनाचे आंदोलन करताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार... - Divya Marathi
टाळ-भजनाचे आंदोलन करताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार...
मुंबई- पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशीही विरोधकांनी शेतकरी प्रश्नांवर सरकारविरोधात विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन केले. मागील दोन दिवस वेगवेगळ्या व कल्पक पद्धतीने सरकारविरोधात आंदोलन करणा-या विरोधकांनी आज भजन- कीर्तन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. विधानभवनाच्या लॉबीत टाळाचा गजर करीत विरोधकांनी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सरकारने विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन करणा-या विरोधकांचे मिडिया कव्हरेज करण्यावर सरकारने मज्जाव केला. यामुळे सरकारही विरोधकांप्रमाणेच भरकटत चालल्याचे चित्र आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आपली मागणी आक्रमकपणे लावून धरली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर या मुद्द्यांवर विरोधक ठाम राहिले. या विषयांकडे सरकारकडून विशेष दखल न घेतली गेल्याने विरोधकांनी सभात्याग केला. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. यानंतर विरोधकांच्या निदर्शनांनी वारकऱ्यांच्या दींडीचे स्वरूप घेतले व गळ्यात टाळ अडकवून कीर्तनाच्या स्वरूपात घोषणाबाजी सुरू झाली.

“देवेंद्रा अजब तुझे सरकार...देवेंद्रा अजब तुझे सरकार”,
“चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वडाला...
देवेंद्र म्हणे नरेंद्रला सरकार आपला बुडाला”
"ज्ञानबा तुकाराम..सरकारचे काय काम..."

अशा अनोख्या घोषणा देत विरोधकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आमदार टाळ वाजवत या दिंडीत सामील झाले होते.
आव्हाडांवर हस्तभंगाचा प्रस्ताव-
राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजतर्रार नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी हस्तभंगाचा प्रस्ताव दाखल केला. आव्हाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ राठोड यांची हिटलर अशी संभावना केली. त्याविरोधात शिंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.
विधानभवनाला प्रदक्षिणा घालून आंदोलन-
काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार तिस-या दिवशीही आक्रमक आहेत. शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. भजन-कीर्तन करीत टाळाचा गजर करीत विधानभवनाच्या तळमजल्याला गोल प्रदक्षिणा घालत शेतकरी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेतले. मात्र, सरकारने विरोधकांकडे दुर्लक्ष केले आहे. विरोधक राजकारण करीत आहेत. सहा महिन्यापूर्वीच आमचे सरकार आले आहे. त्याआधी 15 वर्षे ते सत्तेत होते. त्यांच्यामुळेच शेतक-यांवर ही वेळ आली आहे असे मंत्री एकनाथ खडसे यांनी खडसावून सांगितले.
पुढे पाहा, विरोधकांनी कसे केले अनोखे आंदोलन...
बातम्या आणखी आहेत...