आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोपलवाराचे कथित ऑडिओ प्रकरण: अमरावतीचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण पाटील संशयित?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कथित ऑडिओ प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आरोपी सतिश मांगलेच्या चौकशीतून धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे अमरावतीचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

 

वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्यात आला. ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याची शक्यता या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आल्याची माहिती आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?

सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प मोपलवारांच्या ऑडिओ क्लिपमुळे आणखी वादात अडकला आहे. या प्रकल्पाचे तत्कालीन प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले. ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची त्यावेळी जबाबदारी असणाऱ्या मोपलवार यांच्यावर गंभीर आरोप झाले. धक्कादायक म्हणजे हे आरोप सेटलमेंटचे होते. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...