आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"गे'सोबत लग्नास अनेक इच्छुक, जाहिरातीनंतर 100 वर इच्छुकांनी केला संपर्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्या समलैंगिक मुलासाठी "वर' संशाेधन करणाऱ्या मुंबईतील पद्मा अय्यर यांच्या माेहिमेला चांगलेच यश येत अाहे. अय्यर यांनी त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. त्याची माध्यमांतही चर्चा झाली. त्यामुळे अय्यर यांचा मुलगा हरीशशी विवाहासाठी शंभराहून अधिक इच्छूकांनी पद्मा अय्यर यांच्याकडे संपर्क साधला आहे.
विशेष म्हणजे यात डॉक्टर, इंजिनिअरपासून उद्योजकांचाही समावेश आहे. मुंबई, पुणे, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांमधील अनेक वरांनीही पद्मा यांच्या आवाहनाला साद दिली आहे. ३६ वर्षीय हरीश हा मुंबईतील एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर) या कम्युनिटीचा प्रसिद्ध सदस्य आहे. अमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातही ताे झळकला हाेता.
बातम्या आणखी आहेत...