आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than 2 Thousand Villages Under Drought Condition

मराठवाड्याच्या चारशे गावांना दुष्काळी सवलती, दुष्काळग्रस्त गावांची संख्या २, ३३१

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चालू रब्बी हंगामात राज्यातील १,२५३ गावे नव्याने दुष्काळाग्रस्त ठरली असून त्यातील ४०० गावे मराठवाडा विभागातील आहेत. सर्व दुष्काळग्रस्त गावांना विविध आठ सवलती तातडीने लागू करण्याचा शासन आदेश महसूल विभागाने गुरुवारी संबंधित जिल्हाधिका-यांना जारी केला आहे.

राज्यातील सन २०१४-१५ च्या चालू रब्बी हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी हाती अाली असून त्यात १,२५३ गावांचा समावेश आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील ४४२, पुणे २१, जालना ४०, उस्मानाबाद ३५६ अाणि चंद्रपूर जिल्ह्यातील ३९३ गावांचा समावेश आहे. १३ मार्च रोजी महसूल विभागाने ५० पेक्षा कमी हंगामी पैसेवारी असणारी गावे जाहीर केली होती. त्यात राज्यातील १,०७८ गावांचा समावेश होता. त्या यादीमध्ये आज जाहीर केलेल्या नव्या १, २५३ गावांची भर पडल्याने यंदाच्या रब्बी हंगामात टंचाईसदृश्य (दुष्काळग्रस्त) गावांची एकूण संख्या २ हजार ३३१ इतकी झाली आहे.

राज्यातील यंदाच्या खरीप हंगामात ५० पैशा पेक्षा कमी पैसेवारी आढळून आलेली एकूण गावे २३, ८११ इतकी होती. खरीपच्या तुलनेत राज्यातील रब्बीचा पेरा अत्यल्प असतो. त्यामुळे रब्बी हंमामात दुष्काळग्रस्त म्हणजेच टंचाईग्रस्त गावे कमी तुलनेत कमी अाढळून येत असतात.
यंदाचा दुष्काळ
२०१४-१५ मध्ये राज्याच्या खरीप हंगामात २३,८११ गावांची नोंद झाली आहे. तर रब्बी हंगामात मार्चमध्ये (१०७८गावे) अाणि एप्रिल मध्ये (१२५३ गावे) टंचाईग्रस्त (दुष्काळग्रस्त) म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
या सवलती मिळतील
१. जमीन महसूलात सूट. २. सहकारी कर्जाचे पुनर्गठन. ३. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती. ४. वीज बिलात ३३.५% सूट. ५. परीक्षा शुल्कात माफी (इयत्ता १० वी अाणि १२ वी). ६. रोहयो अंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता. ७. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर. ८. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.