आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील ५५६ पर्यटक सुखरूप!, लातुरकरांना किल्लारीची आठवण, नागपुरात अफवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नेपाळमध्ये पर्यटन, देवधर्मासाठी गेलेले महाराष्ट्रातील ५५६ पेक्षा जास्त पर्यटक सुखरूप असल्याची मािहती विविध सूत्रांद्वारे मिळाली आहे.नांदेडचे ४२ जण नेपाळमधील पोखरा गावात सुखरूप आहेत. नागपूरच्या ५ पथकांत २४० लोकांचा समावेश आहे. नाशकातून १०० जण तीर्थयात्रा, तर १५-२० जण ट्रेकिंगसाठी गेले आहेत.

पैठण : ५.१ तीव्रतेची नोंद
पैठण | जायकवाडीच्या भूकंप मापक यंत्रावर नेपा‌ळ, उत्तर भारतातील भूकंपाची नोंद ५.१ रिश्टर स्केल इतकी झाली. शुक्रवारीही दुपारी ३.३ रिश्टर भूकंपाची नोंंद झाली होती.
आैरंगाबादचे कुटुंब सुरक्षित : देवानगरी येथे राहणारे कॅप्टन संजय रडके, त्यांची पत्नी सरिता आणि श्रद्धा रडके हे पर्यटनासाठी नेपाळला गेले असून ते सुरक्षित आहेत.
महाराष्ट्राची हेल्पलाइन
- महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली : ०११-२३३८०३२५
- मंत्रालय मुंबई : ०२२-२२०२७९९०

आपबीती - अचानक जमीन हादरली आणि आम्हीही..
कुणाल दिनेश अग्रवाल | भूकंपाचे प्रत्यक्षदर्शी (नेपाळमधून खास ‘दिव्य मराठी’साठी वृत्तांत)
नेपाळ दर्शनासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातील ४५ जणांचा समूह २३ एप्रिलला मुंबईहून विमानाने पोहोचलो. त्यात १५ जोडपी आणि उर्वरित मुले-मुली आहेत. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता आम्ही सर्व जण चितवनहून पोखराला जाण्यासाठी निघालो. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जमिनीला हादरे बसू लागले. हादऱ्यांमुळे बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. आम्ही सर्व जण बसमधून उतरलो.... जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांनी आम्हीही हादरलो.... क्षणभर आमच्या मनात किल्लारीच्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. इमारती हालू लागल्या. खिडक्यांची तावदाने दणादण आदळू लागली. लोक घराबाहेर पळत सुटले, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. पण सुदैवाने चितवन, पोखरा भागाला भूकंपाची फारशी झळ बसली नाही. येथे सर्व सुरळित आहे. भूकंपाचे झटके कमी झाल्यानंतर आम्ही नांदेडमध्ये कुटुंबीयांशी संपर्क साधून ख्याली खुशाली कळवली.दुपारी अडीचच्या दरम्यान आम्ही सर्वजण पोखराला पोहोचलो. सध्या आमचा मुक्काम पोखरामध्येच आहे. येथून काठमांडू १७० किलोमीटर अंतरावर आहे. पाच दिवसांच्या सहलीमध्ये सोमवारी काठमांडू पाहण्याची आमची योजना होती. भूकंपामुळे चित्र बदलले आहे. आता काठमांडूत जाऊन काय पहायचे? आम्ही सर्वजण परिस्थिती पाहून तेथे जायचे की नाही, याचा निर्णय घेऊ. २८ तारखेला परतीच्या प्रवासाचे नियोजन होते. काठमांडू विमानतळ लवकर सुरु झाला तर ठरल्याप्रमाणे आम्ही परत येऊ.
पुढे वाचा, लातूरकरांना आठवण किल्लारीची तर नागपूर, चंद्रपुरात अफवांमुळे भीतीचे वातावरण...