आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - भाजपची सत्ता असणा-या राज्यात ख्रिश्चन धर्मीयांवर अधिक हल्ले होत असल्याची आकडेवारी ‘इंडियन ख्रिश्चन संस्थे’ने तयार केलेला अहवाल समोर आली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते सोमवारी या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्यात मागच्या वर्षभरात कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक हल्ले झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
2012 या वर्षात देशातील ख्रिश्चन समुदायांवर एकूण 131 हल्ले झाले. त्यामध्ये कर्नाटकात 37, छत्तीसगड 21, मध्य प्रदेश 18 आणि आंध्र प्रदेशात 13 हल्ले झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मागील वर्षात 5 हल्ले झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 2011 मध्ये देशातील ख्रिश्चनांवर 140 हल्ले झाले होते. भाजपची सत्ता असणा-या राज्यात ख्रिश्चनांवर हल्ले करणा-या दंगेखोरांना पोलिस मोकळे रान देतात. त्यामुळेच भाजपप्रणीत राज्यात हल्ल्यांच्या घटना अधिक असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्राहम मथाई यांनी केला. सिंधुदुर्ग, यवतमाळ आणि ठाणे जिल्ह्यातही हल्लयांच्या घटना घडलेल्या होत्या.
..तर देश जर्मनी बनेल : गांधी
देशातील पोलिसांवर जमातवादाचा पगडा आहे. त्यामुळे पोलिस दलात सुधारणा गरजेच्या असून त्या केल्या नाहीत तर भारत हिटलरच्या जर्मनीप्रमाणे बनेल, असा दावा तुषार गांधी यांनी केला.
गतवर्षीची आकडेवारी
कर्नाटक 37
छत्तीसगड 21
मध्य प्रदेश 18
आंध्र प्रदेश 13
महाराष्ट्र 05
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.