आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Criminal Hearing On Video Conferencing At Mumbai

कुख्यात आरोपींची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरसिंगनेच घ्या- गृहमंत्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आरोपपत्र दाखल करण्याच्या दिवशीच भरकोर्टातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) अतिरेकी अफझल उस्मानीमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नुकतीच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन न्यायालय आणि तुरुंगातील सुरक्षेचा आढावा घेतला. अतिरेकी व कुख्यात गुन्हेगारांची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरसिंगनेच घ्यावी, असा सूर बहुतेक अधिकार्‍यांनी या वेळी लावला.

सुरत व अहमदाबाद स्फोटातील आरोपी अफझल उस्मानी हा शुक्रवारी भर न्यायालयातून पळाला होता. यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गृहमंत्र्यांनी नुकतीच अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीला पोलिस महासंचालक संजीव दयाळ, आयुक्त सत्यपाल सिंग, अतिरिक्त आयुक्त हिमांशू रॉय, राज्य गुप्तचर संस्थेचे आयुक्त के. एल. प्रसाद आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) राकेश मारिया यांची उपस्थिती होती.

बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू हा उस्मानीच होता. त्याच्या पळून जाण्यामागे कोण दोषी आहेत, याबाबत या वेळी चर्चा झाल्याची माहिती दयाळ यांनी दिली. अतिरेकी व कुख्यात गुंड यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात यावी. यामुळे आरोपींच्या सुरक्षेसाठी असलेले मनुष्यबळ लागणार नाही. तसेच उस्मानीसारख्या घटना पुन्हा उद्भवणार नाहीत. राज्य सरकार या मुद्दय़ांवर गांभीर्याने विचार करत असल्याचे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले.