आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे रेल्वे स्टेशन ठरले देशात सर्वात अस्वच्छ, तुटलेले प्लॅटफॉर्म अन् कच-याचा ढीग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ए- 1 श्रेणीत देशात पुणे रेल्वे स्टेशन सर्वात अस्वच्छ ठरले आहे. - Divya Marathi
ए- 1 श्रेणीत देशात पुणे रेल्वे स्टेशन सर्वात अस्वच्छ ठरले आहे.
मुंबई- रेल्वे मंत्रालयाने देशातील महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन्सची स्वच्छता व टापटीप पणाबाबतचे रॅंकिंग जाहीर केले आहे. ए-1 आणि ए श्रेणीतील स्टेशन्सची वेगवेगळी रॅंकिंग केली आहे. ए-1 श्रेणीतील 75 स्टेशन्समध्ये गुजरातमधील सूरतने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर यात पुणे सर्वात शेवटच्या स्थानी आहे. ए श्रेणीतील 332 स्टेशन्समधून पंजाबमधील ब्यास स्टेशनने अव्वल स्थान पटकावले आहे तर मधुबनी शेवटून खाली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन्सची स्वच्छतेबाबत अहवाल सादर केला आहे. जानून घ्या कोणी केला सर्व्हे...
- आयआरसीटीसीने टीएनएस इंडिया प्रा.लि. द्वारे हे सर्वेक्षण केले.
- हे अभियान स्वच्छ रेल स्वच्छ भारत नुसार केले गेले.
- 1.35 लाख प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.
- या आधारावर ए- 1 श्रेणीत 75 आणि ए श्रेणीत 332 स्टेशन्स पाच श्रेणीत वाटली गेली.
- ग्रीन म्हणजेच सर्वात स्वच्छ, तर रेड म्हणजे सर्वात अस्वच्छ. ए-1 श्रेणीत फक्त तीन स्टेशन 1000 पैकी 750 पेक्षा जास्त गुण मिळवू शकले आहेत. तर, ए श्रेणीत 10 स्टेशन्सना या शहरांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
ए- 1 श्रेणी : सर्वात अस्वच्छ स्टेशन्स

1- पुणे
2- मुगलसराय
3- गुवाहाटी
4- हजरत निजामुद्दीन
5- सियालदेह
ए श्रेणी: सर्वात अस्वच्छ स्टेशन

1- मधुबनी
2- बलिया
3- रायचूर
4- शाहगंज
5- बख्तियारपुर जंक्शन.
ए- 1 श्रेणीतील सर्वात स्वच्छ स्टेशन

1- सूरत (गुजरात)
2- राजकोट (गुजरात)
3- बिलासपुर (छत्तीसगढ़)
4- सोलापुर (महाराष्ट्र)
5- मुंबई सेंट्रल (महाराष्ट्र)

ए श्रेणीतील सर्वात स्वच्छ स्टेशन
1- ब्यास (पंजाब)
2- गांधीधाम (गुजरात)
3- वास्को-डि-गामा (गोवा)
4- जामनगर (गुजरात)
5- कुंबकोनम (तामिळनाडू)
पुढे स्लाईडवर क्लिक करून जानून घ्या आणखी कोणती स्टेशन्सचा आहे समावेश...
बातम्या आणखी आहेत...