आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक खेळ पाहणाऱ्यांचा नव्हे, तर सर्वाधिक खेळ खेळणाऱ्यांचा देश अशी आपली ओळख हवी: सचिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- २०२० मध्ये भारत हा जगातील सर्वाधिक युवक असलेल्यांचा देश होणार आहे. त्या वेळी सर्वाधिक खेळ पाहणाऱ्यांचा नव्हे तर सर्वाधिक खेळ खेळणाऱ्यांचा देश म्हणून आपली ओळख निर्माण व्हायला हवी. त्यासाठी सोफ्यावर बसून खेळ पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून कोणत्याही स्तरावर आपल्याला आवडणारे खेळ खेळले पाहिजेत. तरच आपली जगातील सर्वोच्च क्रमांकाची युवा पिढी सशक्त, तंदुरुस्त आणि विचारवंत होईल, अशी भूमिका भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मंगळवारी मुंंबईत मांडली. एका व्यापक आणि अत्याधुनिक क्रीडा वाहिनीच्या घोषणेप्रसंगी सचिन बोलत होता.  

१७ वर्षांखालील युवकांची विश्वचषक स्पर्धा यंदा ऑक्टोबर महिन्यात भारतात होणार आहे. त्या स्पर्धेमुळे जगातील सर्वोत्तम खेळाडू, जे क्रीडा विश्वातील आपल्या अागमनाचे रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज झाले आहेत, त्यांचा खेळ देशातील युवा पिढीला प्रत्यक्ष पाहता येणार आहे. एकाच खेळाची मक्तेदारी मोडून काढण्याची ती सुरुवात असेल, असेही भाकीत सचिनने केले. “१७ या वयात ईर्षा, जोश, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असते. अशा दर्जेदार खेळाला भारतीयांनीही पाठिंबा द्यावा’, असे आवाहन सचिनने केले.  

मी फॉर्म्युला वन, टेनिस, रग्बी, फुटबॉल हे खेळ आवर्जून पाहतो. रॉजर फेडररचा मी फॅन आहेच. परंतु तोही माझा फॅन असल्याचे मला कळले. रॉजरला क्रिकेट कळते. तो व्हिडिओ गेमद्वारे क्रिकेट खेळताना स्वत:ला सचिन म्हणून निवडतो. मीही व्हिडिओवरचे टेनिस खेळताना माझी निवड रॉजर या नावानेच करतो, असेही सचिन म्हणाला.

रग्बीचा सामना पाहून मी चकित झालो होतो
मी रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांचा रग्बी सामना पाहून चकित झालो होतो. कारण त्या वेळी महिला खेळाडूंची जबरदस्त एनर्जी लेव्हल, ईर्षा मी पाहिली. जिम्नॅस्ट दीपा कर्माकरच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे भारताच्या युवा पिढीला आणि प्रामुख्याने युवतींना खेळाबद्दल जबरदस्त आकर्षण वाटायला लागले, असेही सचिनने म्हटले.
बातम्या आणखी आहेत...