आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधाची माहिती पतीला सांगेल म्हणून आईनेच मुलाला विष घालून मारले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपले अनैतिक संबंध 9 वर्षीय मुलाला माहित झाल्याने व तो ही माहिती पतीला सांगेल या भीतीने घाबरलेल्या आईने आपल्या मुलाला विष घालून मारल्याचे तब्बल तीन वर्षानंतर उघड झाले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात मुलाचा मृत्यू पोटात विष गेल्यामुळे झाल्याचे समोर येताच पोलिसांनी आईकडे चौकशी केली असता तिने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वांद्रे पोलिसांनी संबंधित आईवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नेहा चौगुले असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, वांद्रेतील शासकीय वसाहतीत गजानन चौगुले आपली पत्नी नेहा, अमेय व ऐश्वर्या या मुलांसमवेत राहत होते. याचवेळी पत्नी नेहाचे ओळखीतील एकासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आई नेहा व संबंधित पुरुषाला मुलगा अमेयने नको त्या स्थितीत पाहिल्याने आई घाबरली. आता मुलगा ही माहिती पतीला सांगेल व आपले बिंग फुटेल या भीतीने तिने मुलगा अमेयला जेवणात विष टाकून मारून टाकण्याचा निर्णय घेतला. 30 मार्च 2013 रोजी नेहाने ठरल्याप्रमाणे अमेय शाळेतून आल्यानंतर त्याला जेवायला दिले. अमेयचे जेवण होताच त्याला उलट्याचा त्रास होऊ लागला. रक्ताची उलटीही झाली. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना अमेयचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद अचानक मृत्यू अशी करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
सायन हॉस्पिटलने पोस्टमार्टम करून त्याचा व्हिसेरा काढत फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला. अमेयचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे या लॅबच्या अहवालात नमूद करण्यात आले. वांद्रे पोलिसांनी नेहाची चौकशी केली असता तिने अमेयला विष घालून मारल्याची कबुली दिली. दरम्यान, या घटनेने वांद्रेतील सरकारी वसाहतीत खळबळ माजली आहे.