आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाबरोबर मॅरेथॉनमध्ये अनवानी पायाने धावू लागली या सेलिब्रिटीची आई, पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिटनेससाठी नेहमी चर्चेत राहणारे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पन्नाशीमध्ये ट्रायथलॉन स्पर्धा जिंकणारा मिलिंद सोमण त्याच्या अॅथलटीक करिअरमध्ये आणखी एक टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे. मिलिंद सोमणने अहमदाबाद ते मुंबई या ग्रेट इंडियन रनमध्ये सहभाग घेतला असून तो आज मुंबईत पोहोचत आहे. पण स्पर्धा पूर्ण करण्याच्या अखेरच्या टप्प्यावर मिलिंदबरोबर त्याची 75 वर्षीय आईही धावली तेही अनवाणी पायांनी.

मिलिंद सोमण त्याची मॅरेथॉन पूर्ण करत आज मुंबईत पोहोतच आहे. पण मुंबईत पोहोचण्यापूर्वी त्याच्या आईनेही या रेसमध्ये त्याच्याबरोबर धावायला सुरुवात केली. विशेष म्हणजे 75 वर्षे वय असलेल्या मिलिंदच्या आई उषा सोमण यांनी अनवाणी पायांनी धावण्याचा निर्णय घेत त्याच्याबरोबर धावायला सुरुवात केली. तसेच साडी परिधान करून त्या मिलिंद यांच्याबरोबर धावल्या.

उषा सोमण यांनी यापूर्वीही एक मोठा टप्पा गाठला होता. 2014 साळी सामाजिक कामासाठी निधी जमवण्यासाठी त्यांनी 40 तासांत 100 किमी अंतर पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून मिलिंद सोमण यांनी अशा प्रकारची ऊर्जा मिळत असते असे आपण बिनधास्त म्हणू शकतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोमण यांचे फोटो आणि व्हिडीओ..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...