आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या खासगी आयुष्यात डोकावशील तर शीना बोराप्रमाणे ठार मारेन- आईची मुलीला धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तू माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नको अन्यथा तुला शीना बोरा आणि आरूषीप्रमाणे ठार मारून टाकेन अशी धमकी मृणाल पाटीलने तिच्या मुलीला दिली आहे. - Divya Marathi
तू माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नको अन्यथा तुला शीना बोरा आणि आरूषीप्रमाणे ठार मारून टाकेन अशी धमकी मृणाल पाटीलने तिच्या मुलीला दिली आहे.
मुंबई- तू माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नको नाही तर तुला शीना बोरा आणि आरूषीप्रमाणे ठार मारून टाकेन अशी धमकी दिल्याचा आरोप एका मुलीने आईविरोधात केला आहे. याबाबत संबंधित महिलेच्या 15 वर्षीय मुलीने मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात आईविरोधात तक्रार दिली आहे. मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून आई मृणाल पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेशाने चित्रपट दिग्दर्शक असलेली मृणाल पाटील आपल्या 15 वर्षीय मुलीसमवेत मुंबईत राहते. मृणाल पाटील हिची तीन लग्ने झाली आहेत मात्र एकाही पतीबरोबर पटले नसल्याने त्यांच्यापासून तिने घटस्फोट घेतला आहे. संबंधित मुलगी मृणालला पहिल्या पतीपासून झालेली आहे. ती सध्या इयत्ता दहावीत शिकतो. मात्र, मृणाल पाटीलचे आणखी एका व्यक्तीसोबत संबंध जुळले आहेत. त्यामुळे तो व्यक्ती मृणालच्या घरी येतो व राहतो. त्याचा या मुलीला त्रास होत असल्याने संबंधित व्यक्तीला व आईला तिने याबाबत फटकारले होते. त्यामुळे चिडलेल्या आई मृणाल पाटीलने आपल्या स्वत:च्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.
'माझ्या आयुष्यात काय सुरु आहे याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित कर अन्यथा तुला शीना बोरा आणि आरूषीप्रमाणे ठार मारेन' अशी धमकी दिली. यानंतर भेदरलेल्या या मुलीने थेट पोलिसांत जाण्याची धमकी आईला दिली. त्यानंतर मृणाल पाटीलने तिला 6 हिने घरात डांबून ठेवले. याकाळात तिची मोबाईल, पुस्तके काढून घेतली तसेच टीव्ही पाहण्यास मनाई केली. मात्र, या प्रकरणाची कुठेही वाच्यता करणार नाही या अटीवर तिची सुटका करण्यात आली. यानंतर संबंधित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर मुलीने आपल्या आईची दुष्कृत्याचा पाढा पोलिसांसमोर वाचून दाखवला. त्यानंतर पोलिसांनी मृणाल पाटील व संबंधित इसमाची चौकशी करून खातरजमा केली. त्यानंतर आई मृणाल पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढे आणखी वाचा, यासंबंधित माहिती....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...