आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईः उच्चभ्रू सोसायटीत आईने पोटच्या 3 मुलांना ऊसाच्या रसातून पाजले विष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जुहू भागात एका महिलेने पोटच्‍या तीन मुलांना ऊसाच्‍या रसातून विष पाजून मारण्‍याचा प्रयत्‍न केला. प्रियकराच्‍या मदतीने तिने हे कृत्‍य केले आहे. या घटनेमुळे जुहू भागात एकच खळबळ उडाली. काय आहे प्रकरण...
- आरोपी महिलेचे एका परपुरूषासोबत प्रेमसंबंध आहेत.
- महिला तिच्‍या प्रियकरासोबत राहते, तर मुले तिच्‍या पतीकडे.
- काल रात्री ही महिला तिच्‍या मुलांना भेटायला आली व तीने त्‍यांना ऊसाचा रस पाजला.
- मुलांना त्रास होऊ लागल्‍याने त्‍यांना तत्‍काळ हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले.
- सध्‍या तीनही मुलांवर विलेपार्ले पश्चिममधील कूपर हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू आहेत.
- यापैकी एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
- पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
निकोलस हत्‍या प्रकरण..
अनैतिक संबंध, प्रेमकरणात अडथडा किंवा क्षुल्‍लक कारणावरुन लहान मुलामुलींच्‍या हत्‍येचे प्रमाण अलिकडे वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्‍यातील निकोलस प्रकरण असेच चर्चेत आले होते. पुण्‍यातील एका आईने प्रियकराच्‍या मदतीने निकोलसचे अपहरण करून त्‍याची हत्‍या केली होती व मृतदेह राहत्‍या घरात पुरला होता. या संग्रहात पुणे, मुंबईतील विविध घटनांचा आढावा घेतला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, या आईंनीही पोटच्‍या मुलांना संपवले..
1. प्रियकराच्‍या मदतीने मुलाची हत्‍या, घरात पुरला मृतदेह..
2 . डोक्यात बॅटने मारहाण करून मुलाची हत्‍या..
3. खोड्यांना कंटाळून जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्‍या..
4. मुलाच्‍या हत्‍येनंतर आईने केला पोलिसांना फोन..
5. उच्‍चशिक्षित आईने कापली 5 वर्षीय मुलाच्‍या हाताची नस..
6. मुलगा झोपेत असताना धारदार शस्‍त्राने चिरला गळा..