आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mountaineer Praveen Shinde Died After Falling In Lonavala Vally

175 फूट दरीत कोसळून मुंबईच्या गिर्यारोहकाचा लोणावळ्यात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणावळा, पुणे- लोणावळ्याजवळील कामशेत येथे एका दरीत कोसळून मुंबईतील गिर्यारोहकाचा दुर्देवी अंत झाला. प्रविण शिंदे असे या गिर्यारोहक तरूणाचे नाव आहे. कामशेतमधील ढाकची भैरी या ठिकाणी मंगळवारी ही घटना घडली.
डोक्यावर दगड पडल्याने प्रविण दरीत कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, बुधवारी लोणावळ्याच्या शिवदुर्गच्या सदस्यांनी प्रविण शिंदेचा मृतदेह 175 खोल दरीतून बाहेर काढला व पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी तो मृतदेह प्रविणच्या नातेवाईकांना सुपूर्त केला.