आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधनवाढीचा जीअार निघेपर्यंत अांदाेलन सुरूच; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा बैठकीत निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र
मुंबई- राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत येत्या अाठ दिवसांत बैठक घेण्याचे अाश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले असले तरी मानधनवाढीचा निर्णय हाेत नाही ताेपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका कृती समितीने घेतली अाहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबतचे बजेट जाहीर करणे अाजच्या बैठकीत अपेक्षित हाेते. मात्र, ते झाले नाही त्यामुळे मानधनवाढीचा जीअार निघेपर्यंत जिल्ह्याजिल्ह्यात अांदाेलन काढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला अाहे. 

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांत मिळणारे मानधन व इतर सुविधा यांचा अभ्यास करून राज्यातील ९७ हजार सेविका आणि ९६ हजार मदतनीस, तसेच १२ हजार मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधनवाढीचा अहवाल दिला. मात्र, अद्यापही राज्य सरकार  मानधनवाढ करण्यात चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेवा कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून अाझाद मैदानावर बेमुदत संप पुकारला. मंगळवारी भव्य माेर्चाही काढला. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अाणि महिला व बाल विकास विभागाच्या सचिव  विनिता वेद सिंगल यांच्याबराेबर बैठक झाली. या बैठकीत मानधानवाढीच्या संदर्भातील बजेट सादर करणे अपेक्षित हाेते. पण ते सादर करण्यात अाले  नाही.  मंत्रालयात बुधवारी  पुन्हा बैठक हाेणार असून त्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचे बजेट सादर करण्यात अाहे. हे बजेट मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर अाठ दिवसात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल असे अाश्वासन देण्यात अाले. परंतु सरकार वारंवार अाश्वासन देत असून अाता कृती करण्याची गरज अाहे. त्यामुळे माेर्चा संपला असला तरी अांदाेलनाचा निर्धार कायम असल्याचे बैठकीतून दिसून आले.  
 
कामावर येण्याचे आवाहन 
केवळ मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी केंद्राचे काम बंद ठेवून बालके, गरोदर, स्तनदा माता यांना वेठीस धरणे अयोग्य आहे. त्यामुळे कृती समितीने पुकारलेला बेमुदत संप मागे घ्यावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल यांनी  केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...