आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोझाइक - 2011’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन; भास्कर समूहाचा उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशभरातील विविध जाहिरात एजन्सीतील कल्पक क्रिएटिव्ह लीडर्सनी नानाविध उत्पादनांसाठी कलात्मक रीतीने बनवलेल्या व वृत्तपत्रे, नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचे संकलन असलेल्या ‘मोझाइक - 2011’ या देखण्या पुस्तकाचे 29 जून रोजी एका समारंभात थाटात प्रकाशन करण्यात आले. छापील माध्यमांमधील उत्कृष्ट जाहिरातींचे संकलन असलेले हे अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक असून ते दैनिक भास्कर समूहाने प्रसिद्ध केले आहे.
‘मोझाइक’ उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना दैनिक भास्कर समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट जाहिरातींचे संकलन असलेली अनेक पुस्तके पाहण्यात आली. त्या वेळी हे लक्षात आले की, आपल्या देशातील विविध जाहिरात संस्थांमधील क्रिएटिव्ह हेड्सनी प्रिंट माध्यमासाठी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट जाहिरातींचे संकलन असलेले एकही पुस्तक आजपावेतो कोणीही प्रसिद्ध केलेले नाही. ही उणीव ‘मोझाइक -2011’ हे पुस्तक प्रकाशित करून भास्कर समूहाने भरून काढली आहे.
‘मोझाइक-2011’ या पुस्तकात देशभरातील जाहिरात संस्थांपैकी 23 संस्थांनी तयार केलेल्या 77 वैशिष्ट्यपूर्ण जाहिरात मोहिमांतील 150 उत्कृष्ट जाहिरातींचा समावेश आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे सीनियर व्हीपी (मार्केटिंग अँड अ‍ॅप्लिटॅक) संजीव गोयल, लिंटास मीडिया ग्रुपचे चेअरमन व सीईओ लीन डिसुझा, आरेन इनिशिएटिव्हचे चेअरमन, कर्श्मा इनिशिएटिव्हचे संचालक, मल्लिकार्जुन सीआर, सीईओ : स्टारकॉम मीडियाव्हेस्ट ग्रुप, पी. एम. बालकृष्ण : चीफ आॅपरेटिंग आॅफिसर-अलाइड मीडिया, पुनिता अरुमुगम : संचालक - एजन्सी बिझनेस - गुगल इंडिया यांच्या पसंतीस उतरलेल्या प्रत्येकी पाच जाहिरातींचाही ‘मोझाइक -2011’ या पुस्तकामध्ये समावेश आहे.
दैनिक भास्कर समूहाचे नॅशनल हेड व व्हीपी संजीव कोटनाला यांच्या मार्गदर्शनाखाली समूहाच्या ब्रँड कम्युनिकेशन विभागाच्या मॅनेजर नेहा मावानी यांनी ‘मोझाइक -2011’ ची निर्मिती व उपक्रमाचे नेतृत्व केले. या पुस्तकाच्या निर्मितीत दैनिक भास्कर समूहाच्या ब्रँड कम्युनिकेशन विभागाच्या एक्झिक्युटिव्ह गौरी शशिस्थल यांचे सहकार्य लाभले. या पुस्तकाची मांडणी रवी वाजपेयी यांनी केली आहे.
दैनिक भास्कर समूहाने ‘मोझाइक -2011’ या पुस्तकाच्या 4 हजार प्रती काढल्या असून देशभरातील जाहिरात संस्था, मीडिया हाऊसेस, जाहिरातदार तसेच अनेक ग्रंथालयांना त्या वितरित केल्या जातील. या पुस्तकाची इंटरनेट आवृत्ती http://images.bhaskarassets.com/dainikbhaskar2010/books/Final_Book.PDF या संकेतस्थळावर उपलब्ध असून तेथून ती डाऊनलोड करता येईल. या उपक्रमाच्या संयोजन अ‍ॅफॅक्वस यांनी केले तर अ‍ॅड क्लब व एबीपी न्यूज यांचेही त्यात मोलाचे सहकार्य लाभले.