आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Ganesarava Dudhagavakara, Latest News Divya Marathi

खासदार दुधगावकर राष्‍ट्रवादीत?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-शिवसेनेचे परभणी येथील खासदार अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर यांनी शनिवारी मुंबईत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या राष्‍ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले. राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लोकसभेसाठी परभणीत राष्‍ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांना तिकीट मिळणार आहे. दुधगावकरांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. दुधगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु होऊ शकला नाही.