आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Raju Shetty No Comments On Bjp Avoids Party's Mlc

आमदारकी न मिळल्याने राग व्यक्त करून अपरिपक्वता दाखवणार नाही- राजू शेट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला डावलले आहे. याबाबत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उघड नाराजी व्यक्त केली असली तरी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत काहीही बोलणार नसल्याचे म्हटले आहे. आमदारकीसाठी मुख्यमंत्र्यांना सतत भेटणार नाही. तसेच आम्हाला संधी न दिल्याने याबाबत राग व्यक्त करून अपरिपक्वता दाखविणार नाही असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या चार जागांपैकी भाजपने आपल्याकडे एक जागा घेत उर्वरित तीन जागी दोन जागी मित्रपक्षांना तर एक शिवसेनेला दिली आहे. शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उद्धव यांनी संधी दिली आहे. भाजपने आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. तर मित्रपक्ष असलेल्या विनायक मेटे व महादेव जानकर यांना आमदारकी दिली आहे. मात्र, यातून खासदार असलेल्या आठवले व शेट्टी यांच्या पक्षाला वगळण्यात आले आहे. आठवले यांनी राज्यात मंत्रिपद न घेता केंद्रात संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातून नाराजी व्यक्त करण्यात आली नसली तरी स्वाभिमानीच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेट्टी यांनी आमदारकी न मिळल्याने राग व्यक्त करून अपरिपक्वता दाखवणार नाही असे म्हटले आहे. देसाई, वाघ, जानकर व मेटे यांनी आज दुपारी दोन वाजता विधानभवन सचिवांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.