आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Raju Shetty Want To Be Close With Uddhav Thackeray

राजू शेट्टी, खोत \'मातोश्री\'वर, सेनेशी सलगी वाढविण्याचा \'स्वाभिमानी\' प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पोटनिवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात जाताच महायुतीतील घटकपक्षांनी आता शिवसेनेशी सलगी वाढविण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. भाजपला पोटनिवडणुकीत बसलेला फटका व राष्ट्रवादीने शेतक-यांच्या मुद्यांवरून राजू शेट्टींना कोल्हापूरात लक्ष्य केल्याने स्वाभिमानीने शिवसेनेशी घरोबा करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. महाराष्ट्रातूनही 48 पैकी 42 जागा जिंकल्या. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप वरचढ ठरेल असे बोलले जात होते. त्याच वेगवेगळ्या वाहिन्यांनी केलेल्या पाहणी सर्वेत शिवसेनेपेक्षा भाजपला जास्त मिळतील असे निष्कर्ष दाखविण्यात आले. त्यामुळे महायुतीतील घटकपक्ष भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना समान अंतरावर ठेवू इच्छित होते. राजू शेट्टीही त्याला अपवाद नव्हते.
दुसरीकडे, भाजप शिवसेनेवर जागावाटपासाठी दबाव वाढवत होता. त्यावेळी घटकपक्षांनी दोन्ही पक्षांना सबुरीचा सल्ला देत आपल्याला आघाडीला पराभूत करायचे आहे. आपापसात वाद होतील व जनतेत चुकीचा संदेश जाईल असे वागू नका हे सांगण्यास विसरले नव्हते. मात्र, मुख्यमंत्रीपद मिळवायचेच व सेनेला आपल्यापेक्षा कमी दाखविण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून वारंवार झाला. मात्र, शिवसेना बधली नाही. आता अशातच पोटनिवडणुकीचे निकाल आले आहेत. लोकसभेला मोदींना ज्या पद्धतीने लोकांनी मतदान केले त्याप्रमाणे विधानसभेला होत नसल्याचे उत्तराखंड, बिहार, यूपी, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील निकालाने दाखवून दिले आहे. शिवसेनाही भाजपला लोकसभा व विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या असतात व त्याचे संदर्भ वेगळे असतात हे सांगत आली आहे. मात्र, भाजप हे ऐकायला तयार नाही.
शेतक-यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीने स्वाभिमानीला लक्ष्य करताच शेट्टी-खोत जोडी सावध... सविस्तर वाचा पुढे...