आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Ramdass Athawale Declierd 13 Candidate Of His Party For Assembly Poll

महायुतीत पेच: रामदास आठवलेंना हव्यात 20 जागा, 13 उमेदवार केले जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: रामदास आठवले)
मुंबई- विधानसभा निवडणुकीत खासदार रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाला 20 जागा हव्या असून, त्यांनी 13 जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यातील निम्म्या जागा एकट्या मुंबईतील आहे हे विशेष. दरम्यान, आठवले यांनी आम्हाला 20 जागा मिळाव्यात व सन्मानजनक सत्तेचा वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. येत्या 10 दिवसात जागावाटपाचा सोक्षमोक्ष लावा नाहीतर विचार करावा लागेल असा इशाराही आठवले यांनी दिला आहे. दुसरीकडे, महायुतीतील सर्व घटकपक्षांना मिळून 10-15 जागा द्याव्यात असे भाजप- शिवसेनेला वाटत आहे. यावरून आगामी काही दिवसात महायुतीत चांगलाच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
आधी उमेदवार दाखवा, मगच जागेची मागणी करा अशी अट भाजप-शिवसेनेने घटकपक्षांना घातल्याने खासदार आठवले यांनी आपल्या 13 उमेदवारांची यादीच या नेत्यांना दिली. तसेच याची कॉपी माध्यमांना दिली गेली. त्यानुसार बहुतेक जागा मुंबई व शहरी पट्ट्यातीलच असल्याचे दिसून येत आहे.
आरपीआयने सादर केलेली यादी अशी- अविनाश महातेकर (कुर्ला मतदारसंघ), दीपक निकाळजे (चेंबूर), गौतम सोनावणे (अणुशक्तीनगर), तानसेन ननावरे (मानखुर्द), अर्जुन डांगळे (विक्रोळी), काकासाहेब खंबाळकर (चांदिवली), पी. के. जैन (कुलाबा), साधू कटके (धारावी), महेश खरे (बेलापूर), अनिल गांगुर्डे (देवळाली, नाशिक), परशुराम वाडेकर (पुणे कॅम्प, पुणे), चंद्रकांता सोनकांबळे (पिंपरी), डॉ. अनिल बोंडे ( मोर्शी, अमरावती) आदी 13 नेत्यांची उमेदवारी पक्षातर्फे जाहीर केली आहे. आता भाजप-शिवसेना पक्ष खासदार आठवलेंच्या पक्षाला यातील कोणत्या जागा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप-शिवसेनेसह महायुतीच्या सर्व घटक पक्षांची काल मुंबईत बैठक पार पडली. यात शिवसेना कोणत्याही स्थितीत माघार घेत नसल्याचे दिसून आले. तर, भाजपने आम्हाला जागा वाढवून मिळाल्याच पाहिजेत असा सूर लावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आता महायुतीत आणखी चार पक्ष आल्याने जागावाटपांची नव्याने मांडणी करावी असे मत मांडले. याला शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. कोणत्याही स्थितीत कमी जागा लढविणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
कमीत कमी जागा घटकपक्षांना देण्यात याव्यात या भूमिकेवर या दोन पक्षातील नेत्यांत एकमत झाल्यामुळे राजू शेट्टींसह महादेव जानकर नाराज झाल्याची चर्चा आहे. राजू शेट्टींच्या पक्षाला 5 जागा देण्याचा विचार सुरु आहे. अशा परिस्थितीत राजू शेट्टी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुढे वाचा, भाजप-शिवसेनेतील धुसफुस वाढली आणि फडणवीसांच्या नेतृत्त्वाची कसोटी...