आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहस्रबुद्धेंना केंद्रात मंत्रिपदाची शक्यता, रावसाहेब दानवे महाराष्ट्रात परतणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रावसाहेब दानवे यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने या पदाला पूर्ण न्याय देण्यासाठी त्यांना केंद्रातील मंत्रिपदाचा त्याग करावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोट्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांना ते संसदेचे सदस्य नसताना आपल्या मंत्रिमंडळात घेऊन रेल्वेसारखे अत्यंत महत्त्वाचे खाते बहाल केले आहे. त्याच धर्तीवर विनय सहस्रबुद्धे यांच्याही नावाची चर्चा सध्या सुरू असून त्यांना महाराष्ट्राच्या कोट्यातून घेतले जाईल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. सहस्रबुद्धे यांची क्षमता आणि अनुभव लक्षात घेता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते आणि तसे झाले तर मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे.
विनय सहस्रबुद्धे हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख संचालक होते आणि या संस्थेच्या निर्मिती आणि िवकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय जनता पक्षातील बुद्धिवंतांमध्ये त्यांची गणना होते. त्यामुळे त्यांना रावसाहेब दानवे यांच्याऐवजी घेण्यात येत असले तरी कॅबिनेट दर्जाचेच पद दिली जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे या बदलाकडे भाजप पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

छत्रपतींचा आशीर्वाद, कल्पना सहस्रबुद्धेंची
महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपच्या प्रचारात छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ! ही टॅगलाइन महत्त्वाची ठरली. या ओळीची कल्पना सहस्रबुद्धेंची होती. यासाठी मोदींना त्यांनी रायगड किल्ल्यावर नेऊन शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊनही आणले होते. रायगडावरून परतल्यानंतर राज्यात सर्वत्र शिवाजी महाराजांपुढे मोदी नतमस्तक झाल्याचे फोटो झळकले. भाजपच्या या रणनीतीने शिवसेनाही गांगरून गेली होती.

इराणी ठरल्या वादग्रस्त
शैक्षणिक पात्रतेबाबत खोटी माहिती पुरवल्याची झालेली टीका, ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्यावर उठलेली झोड, फ्रेंचऐवजी संस्कृत भाषेची केलेली सक्ती यामुळे स्मृती इराणींकडून ते खाते काढून घेण्याच्या मानसिकतेत पंतप्रधान असल्याचे सांगण्यात येते.
सदानंद गौडांचे उदाहरण
सदानंद गौडा यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेताना मोदी यांनी ते मंत्रिमंडळातील अन्य कोणाला देण्याऐवजी नव्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्याकडे दिले. स्मृती इराणींच्या बाबतीतही मोदी तसेच करू शकतात, असा कयास केला जातो आहे.