मुंबई/अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार, राज्य मंत्रिमंडळातल्या खांदेपालटाची जोरदार चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेकांच्या मंत्रिपद गमवावे लागण्याची तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. सोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्षपदावरून रावसाहेब दानवे यांना दूर करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी खासदार संजय धोत्रेंचे नाव चर्चेत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह काही अतिकार्यक्षम तर काही अकार्यक्षम मंत्र्यांचीही हंडी फुटणार हे नक्की झाले आहे. दानवेंना पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. संभाव्य प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. या संभाव्य नावांमध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांबद्दल केलेले 'ते' आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला आणि आता थकवलेले वीज बिल यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या गच्छंतीची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे सुभाष देसाई यांचे 'उद्योग' पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते नाराज आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळविली आहे
पुढील स्लाइडवर...वाचा कोण आहेत खासदार संजय धोत्रे?