आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंचे संयुक्त राष्ट्रात भाषण, कृषी व अन्नसुरक्षेबाबत मांडली देशाची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/न्यूयॉर्क- खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीत (United Nations general Assembly) भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ सध्या अमेरिका दौऱ्यावर असून खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांसमोर अन्नसुरक्षा, कृषीविकास आणि पोषण आहार यावर भारत देशाची भूमिका मांडली.
न्यूयॉर्क येथे युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंबलीचे 70 वे सत्र सध्या सुरु आहे. संसदेतील खासदारांचे शिष्टमंडळ या दौऱ्यावर भारतातर्फे प्रतिनिधित्व करत असून खासदार सुप्रिया सुळे या शिष्टमंडळात सहभागी आहेत. अन्नसुरक्षा, कृषीविकास आणि पोषण आहारासंदर्भात देशाने आत्तापर्यंत राबविलेली धोरणे, कृती कार्यक्रम, कुपोषणावर मात करण्यासाठी उचलली गेलेली पावले याची माहिती दिली. 2030 पर्यंत शाश्वत विकास अर्थात भूक, दारिद्र्यमुक्त जग हा अजेंडा जगभरातील नेतृत्वांनी स्वीकारत त्या दृष्टीने वाटचाल करत आहेत. सुरक्षित, पुरेसे, सहज सर्वांना अन्न उपलब्ध होण्यासाठी, कुपोषणमुक्त बनण्यासाठी भारताने अनेककलमी कृति कार्यक्रमांना अनुकूलता दर्शविल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. या दौऱ्यात खासदार राहुल कासवान, सपाचे खासदार राम गोपाल यादव, खासदार रिती पाठक हे इतर पक्षांचे खासदारही सहभागी झाले आहेत.
पुढे पाहा, खासदार सुप्रिया सुळेंची न्यूयॉर्क दौ-यातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...