आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Udayanraje Bhosale Meet Amitabh Bachchan In Mumbai

उदयनराजेंनी घेतली बिग बींची भेट, अमिताभ बच्चन जाणार साता-यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सात-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. - Divya Marathi
सात-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याबद्दल मला नितांत आदर आहे. या घराण्याकडून मला मिळणारा पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज अखेर मला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, अशा शब्दात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
छत्रपती घराणे आणि सातारकरांच्यावतीने शिवसन्मान पुरस्कार अमिताभ बच्चन यांना लवकरच देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बिग बींनी साता-यात यावे, असे निमंत्रण उदयनराजे भोसले यांनी नुकतेच दिले. हे निमंत्रण देण्यासाठी बच्चन यांच्या जुहूतील ‘जनक'’ या निवासस्थानी उदयनराजे गेले होते. त्यावेळी उदयनराजे यांनी बच्चन यांना स्फटिकाची वनपीस तलवार भेट दिली. त्यानंतर बच्चन यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
अमिताभ म्हणाले, मला सातारबाबत खूपच आत्मीयता आहे. साता-यात असणारे निसर्ग सौंदर्य पाहण्याचीही मला इच्छा आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी लवकरात लवकर तारीख देईन. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे या कर्मभूमीतील छत्रपती घराण्याकडून मिळणारा पुरस्कार मला सर्वात महत्त्वाचा आणि अभिमानाचा वाटतो. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती घराण्याचा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल उदयनराजे यांनी आभार मानले आहे.
पुढे पाहा, महाराजा आणि महानायक यांच्या भेटीतील क्षणचित्रे...