आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) 7 एप्रिलला होणारी पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली. नवीन तारीख आयोग लवकरच जाहीर करील, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.
एमपीएससीचे सर्व्हर व्हायरसमुळे डाऊन झाले आणि विद्यार्थ्यांच्या अर्जाचा डेटा करप्ट झाला. हा मुद्दा गुरुवारी गाजला. राज्य सरकारने परीक्षा रद्द करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे निर्णय होईपर्यंत कामकाज चालवू नये, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.
परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घेतली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘आठ-दहा दिवस परीक्षा पुढे ढकलली तर काही आभाळ कोसळणार नाही. हे मत मी आमदारांच्या बैठकीत मांडेन.’ यावर सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभापती आणि उपसभापतींनीही निर्णय होईपर्यंत कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
दुपारनंतर या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक घेतली. यावर विधान परिषदेत त्यांनी निवेदन केले.