आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MPSC Examination Decision Takes On Friday : Secreatary Rajendra Mangalurkar

एमपीएससी परीक्षेबाबत शुक्रवारी निर्णय; सचिव राजेंद्र मंगळूरकर यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऐन परीक्षेच्या तोंडावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे सर्व माहिती डिलीट झाल्यामुळे राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. राज्यभरातील सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज दाखल करावे लागणार आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचा अंतिम निर्णय येत्या पाच तारखेलाच घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया एमपीएससीचे सचिव राजेंद्र मंगळूरकर यांनी बुधवारी दिली.

एमपीएससीची सर्व्हर क्रॅश झाल्याने मंगळवारी वेबसाइटवरील परीक्षार्थ्यांची संपूर्ण माहिती ‍करप्ट झाली होती.
आयोगाच्या परीक्षेत एकूण साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. येत्या सात एप्रिल रोजी ही परीक्षा होणार आहे. त्यातील 45 हजार विद्यार्थ्‍यांनी आपली माहिती नव्याने अपलोड केली आहे. विद्यार्थ्‍यांनी आपली म‍ाहिती गुरूवारपर्यंत (ता.चार ) अपडेट करावी व त्यात विचारलेली माहितीच द्यावी, असे आयोगातर्फे सांगण्‍यात आले आहे. नेट बँकिंगद्वारे फी भरलेल्यांनी फक्त अर्ज क्रमांक दिल्यावर त्यांना हॉल ति‍किट मिळेल. आयोगाने केलेल्या खुलाशामुळे परीक्षार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.