आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mpsc Scam : Pujari's Report Submit High Court Order

एमपीएससी घोटाळा; पुजारींबाबतचा अहवाल देण्याचे हायकोर्टाचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - राज्यात गाजलेल्या एमपीएससी घोटाळ्याच्या सूत्रधारांना गजाआड करणारे पोलिस अधिकारी सुधाकर पुजारी यांच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या कथित संबंधांविषयीचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. पुजारी यांच्या गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांबाबत पुरावे उपलब्ध असतानाही त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. याकडे डोळेझाक करणा-यांविरोधातही कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अविनाश सणस व नॅशनल अ‍ॅम्नेस्टी अँड रिडम्प्शन ऑर्गनायझेशन अँड इंटरनॅशनल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक कवितकर यांनी दाखल केली आहे.