आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहास खामकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पनवेल - नऊ वेळचा मिस्टर इंडिया किताब विजेता महाराष्ट्राचा शरीरसौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरला 50 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचा साथीदार गणेश भोगाडे याचीही पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

पनवेल तालुक्यातील कोयनावळे गावातील जमिनीची सातबारावर नोंद करण्यासाठी खामकरने शेतकर्‍याकडे त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची मागणी केली होती. शिवाय, संबंधित काही कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव देण्याची सूचनाही केली होती. प्रस्तावाची नोंद झाली की नाही हे पाहण्यासाठी शेतकरी 30 जुलै रोजी तहसीलमध्ये गेले असता खामकरने कार्यालयातील सहायक गणेश भोगाडेला भेटण्यास सांगितले. भोगाडे याने काम पूर्ण करून देण्यासाठी 60 हजार रुपये मागितले. मात्र, तडजोडीनंतर 50 हजार रुपये देण्याचे ठरले. संबंधित शेतकरी याबाबत रायगडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने दिलेले पैसे गणेश भोगाडेकडून घेताना खामकरला एसीबीच्या पथकाने अटक केली होती. दरम्यान माझ्याविरोधात हे षड्यंत्र रचण्यात आले असल्याचे खामकरचे म्हणणे आहे.