आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारसाेबतची चर्चा व्यर्थच, एसटीचे कर्मचारी संपावर ठाम; सरकारची समितीवर बाेळवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरपासून संपाची हाक देणाऱ्या कर्मचारी संघटनांसोबत सोमवारी मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. तथापि, त्यात ठोस तोडगा न निघाल्यामुळे संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सर्वमान्य तोडगा काढून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. त्यात एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विविध एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतील. समितीने चर्चा करून वेतनवाढीबाबत सन्मान्य तोडगा द्यावा, तो निश्चित मान्य करू.’ 
 
समितीवर बाेळवण
सूत्रांनुसार, बैठकीत कर्मचारी संघटनांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची लेखी हमी मागितली. तसेच १० हजार रुपयांची हंगामी वेतनवाढ देण्याची मागणी केली. मात्र सरकारने केवळ समितीवर बोळवण केल्यामुळे ही चर्चा फिसकटली.
 
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या तीन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
 
संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचारी
सर्व संघटना समावेशक असलेल्या या संपामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका संपात सहभागी संघटनांनी घेतली आहे. 26 मे 2017 रोजी राज्यातील प्रत्येक एसटी आगारात संपाच्या संदर्भात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचाऱ्यांनी कौल दिला होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...