आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी जाणार संपावर; खासगी बस ऑपरेटरांकडून अव्वाच्यासव्वा दराची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- ऐन दिवाळीत विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. सहा मान्यताप्राप्त संघटना या संपात सहभागी होणार असून 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजे 17 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर जातील.
 
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या तीन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
 
संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचारी
सर्व संघटना समावेशक असलेल्या या संपामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका संपात सहभागी संघटनांनी घेतली आहे. 26 मे 2017 रोजी राज्यातील प्रत्येक एसटी आगारात संपाच्या संदर्भात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचाऱ्यांनी कौल दिला होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...