आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी प्रशासन संप मिटविण्याऐवजी चिघळवत असल्याचा इंटकने केला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटकचे सरचिणीस मुकेश तिगोटे. - Divya Marathi
इंटकचे सरचिणीस मुकेश तिगोटे.
मुंबई- संप मिटविण्याऐवजी एसटी प्रशासन संप चिघळवत आहे, असा आरोप इंटकचे सरचिणीस मुकेश तिगोटे यांनी केला केला. सरकारने जोरजबरदस्ती केली तर आम्ही कुटुंबियांसह राज्यभर जेलभरो आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
राज्यातील विविध आगरातून कर्मचाऱ्यांना हकलवून दिले जात आहे. दमदाटी केली जात आहे. सर्क्युलर काढून होमगार्ड्सची भरती करून एसटी काढल्या जात आहेत. कालच्या प्रस्तावानुसार आम्हाला 4 ते 5 हजार वेतन वाढ मिळेल, 12 ते 13 हजार रुपये पगारात आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत. इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे हीच आमची आग्रहाची विनंती आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, चर्चेसाठी बोलावले तर आम्ही तयार आहोत, असे मुकेश तिगोटे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...