आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचार्‍यांचे वेतन 70 टक्क्यांपर्यंत वाढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मंजुरी दिली. सन 2012-2016 या कालावधीसाठी ही वाढ असणार आहे. वेतनासाठी 1638 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नव्या करारानुसार कनिष्ठ वाहकांच्या वेतनात 70 टक्के, चालक 51 टक्के, तर लिपिकांच्या वेतनात 44 टक्के वाढ होणार आहे.

मुंबईत शनिवारी एस. टी. पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पडला. यानंतर संघटनेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांत वेतनवाढीबाबत चर्चा झाली. चर्चेत मुख्यमंत्र्यांनी वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.